मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण mukhyamantri majhi ladki bahin yojana

ladki bahin yojana update

लाडक्या बहिणींना मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे नाही मिळालेल्या महिलांच्या खात्यात दोन दिवसात 3,000 हफ्ता जमा होणार
मार्च आणि एप्रिल महिन्याचे ₹३००० एकत्र जमा होणार!

१. प्रलंबित हप्त्याचा मार्ग मोकळा:
राज्यामध्ये १४ मे २०२६ पासून मार्च महिन्याचे आणि १५ मे पासून एप्रिल महिन्याचे मानधन वितरित करण्यास सुरुवात झाली होती. परंतु, राज्यातील अनेक महिला लाभार्थ्यांना तांत्रिक कारणांमुळे हे पैसे मिळाले नव्हते.

२. ‘या’ प्रवर्गातील महिलांना मोठा दिलासा:
या प्रलंबित मानधनामध्ये सर्वात जास्त संख्या एससी (SC – अनुसूचित जाती) प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांची होती. या बहिणींचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यावर जमा झाला नव्हता, जो आता तात्काळ मिळणार आहे.

३. ७३० कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर:
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी एकूण ७३० कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

४. अधिकृत जीआर (GR) निघला:
या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय आज २० मे २०२६ रोजी निर्गमित (जारी) करण्यात आला आहे.

५. पुढील १-२ दिवसांत खात्यात पैसे जमा होणार:
जीआर निघाल्यामुळे आता येत्या १ ते २ दिवसांमध्ये पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रलंबित असलेला मार्च (₹१५००) आणि एप्रिल (₹१५००) असा एकूण ₹३००० चा हप्ता ताबडतोब क्रेडिट (जमा) केला जाणार आहे.

६. नियमात महत्त्वाचा बदल:
यापुढे महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत आवश्यक असलेल्या निधीची मागणी सरकारने करावी, अशी कडक सूचनाही या जीआरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महाराष्ट्र शासनाची महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रु. (1500) आर्थिक सहाय्य दिले जाते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – अत्यंत महत्त्वाची माहिती 🚨
ज्या लाडक्या बहिणींना मागील काही महिन्यांचे (उदा. मार्च, एप्रिल किंवा त्यापूर्वीचे) हप्ते अद्याप मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि काळजी वाढवणारी अपडेट समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांच्या बँक खात्यात मागचे हप्ते जमा झालेले नाहीत, त्यांना या योजनेतून बाद (अपात्र) करण्यात आल्याची दाट शक्यता आहे.
🛑 तुम्हाला हप्ते न मिळण्याची मुख्य कारणे काय असू शकतात?
१. बँक खाते आधार लिंक (Aadhar Linking) नसणे: जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नसेल, तर डीबीटी (DBT) द्वारे येणारे पैसे जमा होत नाहीत.
२. केवायसी (KYC) अपूर्ण असणे: चुकीची Kyc करणे
३. अर्ज पडताळणीत त्रुटी: शासकीय पडताळणीदरम्यान अर्जात काही चूक किंवा अपात्रतेचे निकष आढळल्यास नाव यादीतून वगळले जाऊ शकते.
४. अर्ज नाकारला जाणे (Rejected): सुरुवातीला मंजूर झालेला अर्ज नंतरच्या पडताळणीत बाद ठरवला गेला असण्याची शक्यता आहे.
५. त्यामुळे अश्या लाडक्या बहिणींना सद्या तरी काही पर्याय उपलब्ध नाही. अजून काही नवीन अपडेटस आले तर कळविण्यात येईल त्यासाठी पेज ला Follow करून ठेवा धन्यवाद. 🙏