contented life
एका युगाचा अंत होत आहे…
येणाऱ्या १०-१५ वर्षांत एक संपूर्ण पिढी हे जग सोडून जाणार आहे… ती पिढी म्हणजे आजचे ‘ज्येष्ठ नागरिक’, ज्यांचे वय सध्या ६० ते ७५ वर्षांच्या दरम्यान आहे.
ही पिढी खरोखरच खूप वेगळी आहे…
रात्री लवकर झोपणारी, पहाटे लवकर जागी होणारी आणि पहाटेच्या थंड हवेत फिरायला जाणारी ही माणसं.
अंगणातील झाडांना पाणी देणारी, देवाची पूजा करण्यासाठी फुले तोडणारी, मनापासून पूजा-अर्चा करणारी आणि दररोज न चुकता मंदिरात जाणारी ही पिढी.
रस्त्यात भेटणाऱ्या लोकांशी थांबून गप्पा मारणारी, त्यांच्या सुख-दुःखाची चौकशी करणारी, दोन्ही हात जोडून नमस्कार करणारी आणि देवाचा नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नाचा कणही तोंडात न टाकणारी ही माणसं.
त्यांचं जगच किती निराळं होतं…
सण-वार, पाहुणचार, शिष्टाचार, अन्न-धान्याची चिंता, तीर्थयात्रा, चालीरीती आणि सनातन धर्माभोवती फिरणारं त्यांचं आयुष्य.
जुन्या फोनवरच खूश राहणारे, फोन नंबरची डायरी जपून ठेवणारे, चुकून रॉन्ग नंबर लागला तरी प्रेमाने बोलणारे आणि वर्तमानपत्र दिवसातून दोन-तीन वेळा वाचणारे लोक.
एकादशी कधी आहे हे तोंडपाठ असणारे, अमावस्या-पौर्णिमा लक्षात ठेवणारे, देवावर प्रचंड श्रद्धा ठेवणारे, समाजाचा आदर (आणि धाक) बाळगणारे, वर्षानुवर्षे तीच जुनी चप्पल, बनियान आणि चष्मा वापरणारे साधे लोक.
उन्हाळ्यात लोणची-पापड बनवणारे, घरचा कुटलेला मसाला वापरणारे आणि बाजारात नेहमी गावरान टोमॅटो, वांगी, मेथी शोधणारे हे रसिक.
तुम्हाला माहित आहे का? हे सर्व लोक हळूहळू आपली साथ सोडून जात आहेत.
तुमच्या घरातही असे कोणी आहे का? जर असतील, तर त्यांची खूप काळजी घ्या.
नाहीतर एक महत्त्वाची शिकवण त्यांच्यासोबतच कायमची निघून जाईल… ती म्हणजे ‘संतोषी जीवन’, साधेपणाने जगण्याची कला, प्रेरणा देणारं आयुष्य, भेसळ आणि दिखाव्याशिवाय जगणं, धर्माच्या मार्गावर चालणं आणि सर्वांची काळजी घेणारं आत्मीय जीवन.
तुमच्या कुटुंबात जे ज्येष्ठ आहेत, त्यांना मानसन्मान, आपुलकी, वेळ आणि प्रेम द्या. जमल्यास त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करा.
संस्कारच गुन्हेगारी रोखू शकतात,
सरकार नाही!!
हि देखील एक प्रथा सुरू करावी..!!
आजपासून… आत्तापासून…*
हॉस्पिटल = लिफाफा.
हीच खरी माणुसकीची प्रथा.
लग्न… मंडप सजलेला असतो. सनईचे सूर घुमत असतात.
नवरी नटून थटून बसलेली असते.
आपण मोठ्या तोऱ्यात जातो. खिशातला लिफाफा काढतो.
“नव्या संसाराला हातभार” म्हणून 500, 1000, 5000 रुपये हसतमुखाने देतो.
फोटो काढतो. स्टेटस ठेवतो.
“किती भारी आहेर दिला” याची चर्चा चार दिवस रंगते.
पण…
पांढऱ्या भिंती. औषधांचा दर्प.
ICU बाहेर एक बाई भिंतीला टेकून बसलेली असते.
तिची ओटी रिकामी, कपाळावरचं कुंकू पुसट होत चाललंय.
नवऱ्याचा श्वास नळीतून चाललाय.
डॉक्टर दर 2 तासांनी बाहेर येतात आणि एकच वाक्य बोलतात: “बिल भरलं का?”
तिच्या पोरगं मेडिकलच्या काऊंटरवर उभं राहतं.
हातात चिठ्ठी असते: “इंजेक्शन 8000 रुपये.”
खिशात फक्त 2000.
तो गपचूप मागे फिरतो. इंजेक्शन न घेताच.
बाप आत तडफडतोय आणि पोरगं बाहेर लाचार उभं आहे.
घरातलं मंगळसूत्र केव्हाच विकलं गेलंय.
बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेली FD मोडली गेलीय.
शेजाऱ्यांकडे, नातेवाईकांकडे हात पसरून झाले.
आता फक्त डोळ्यात पाणी आणि ओठावर एकच प्रार्थना: “देवा, वाचव रे माझ्या माणसाला.”
आणि अशा वेळी आपण जातो…
हातात दोन सफरचंद.
टेबलावर ठेवतो आणि म्हणतो, “काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल.”
“काही लागलं तर बिनधास्त सांग.”
खरंच?
बिनधास्त सांगू?
“वहिनी, 50 हजार कमी पडतायत, द्याल का?” असं विचारायची हिंमत आहे का तिच्यात?
नाही. ती फक्त मान डोलावते आणि आतल्या आत मरते.
आपण निघून येतो. गाडीत बसतो.
“बिचारी” म्हणून एक सुस्कारा टाकतो.
आणि घरी येऊन जेवण करतो.
पण तिचं जेवण?
तिच्या पोरांचं जेवण?
हॉस्पिटलच्या बिलाने त्यांच्या ताटातला घास हिरावून घेतलाय.
जिथे ढोल ताशे आहेत, तिथे आपण लाखो उधळतो.
आणि जिथे व्हेंटिलेटरचा ‘बीप बीप’ आवाज येतोय, मृत्यू दारात उभा आहे, तिथे आपण 100 रुपये द्यायलाही दहा वेळा विचार करतो.
ही कुठली माणुसकी? ही कुठली रीत?
आज शपथ घ्या…
पुढच्या वेळी कुणी आजारी असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, तर रिकाम्या हाताने जायचं नाही.
लिफाफा न्यायचाच. 100 रुपये असले तरी चालतील.
कारण तो लिफाफा नसतो… तो ‘श्वास’ असतो.
“तू लढ, मी आहे सोबत” हा दिलासा असतो.
कदाचित तुमच्या त्या लिफाफ्यामुळे…
एका बापाला त्याची पोरं पुन्हा “बाबा” म्हणू शकतील.
एका नवऱ्याला त्याची बायको पुन्हा “अहो” म्हणू शकेल.
एका पोराला त्याची आई पुन्हा जेवू घालू शकेल.
लग्नातला आहेर लोक विसरतात हो…
पण स्मशानाच्या वाटेवरून परत आणणारा आधार, माणूस मेल्यावरही विसरत नाही.
ही प्रथा सुरू करा.
कारण उद्या काळाने घाला घातला आणि तुमचाच माणूस त्या बेडवर असेल…
तेव्हा तुम्हाला कळेल की ‘Get Well Soon’ च्या कार्डापेक्षा 500 च्या नोटेची किंमत काय असते.
आजपासून… आत्तापासून…
हॉस्पिटल = लिफाफा.
हीच खरी माणुसकीची प्रथा.
वाचून डोळे पाणावले असतील तर नक्की शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्यातरी घरचा दिवा विझायचा थांबेल…
“लग्नातला आहेर मिरवला जातो,
आजारपणातला आधार जपला जातो.
कारण मृत्यूच्या दारात उभा असताना,
माणूसच माणसाचा देव असतो.” माणुसकी






