शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी

शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी crop loan waiver decision

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीला अखेर मुहूर्त मिळाला असून मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा प्रस्ताव सादर होणार आहे.
शेतकरी कर्जमाफी झाली! मंत्रिमंडळ बैठकीत अखेर शिक्कामोर्तब; वाचा किती रुपये माफ होणार
राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे आता 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे

कर्जमाफीतील महत्त्वाचे मुद्दे
२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीला सरकारकडून मान्यता देण्यात आली.
राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ५६ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी सरकारकडून करण्यात आली आहे.
कर्जमाफीची अंदाजे रक्कम जवळपास ३६,००० कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.
३० सप्टेंबर २०२५ पूर्वीच्या थकीत कर्जदारांचा समावेश.
थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही फायदा.

३० जूनपूर्वी खात्यात जमा होणार रक्कम
महायुती सरकारच्या नेत्यांकडून वारंवार दिल्या गेलेल्या आश्वासनानुसार, कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ३० जूनपूर्वी जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ संदर्भात अंतिम निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

राष्ट्रीयीकृत बँका
जिल्हा व राज्य सहकारी बँका
खासगी बँका
ग्रामीण बँका
या बँकांकडून कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचा योजनेत समावेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. सहकार विभागाने संबंधित माहिती शासनाकडे सादर केली आहे.
56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार
सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. तसेच जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात, त्यांना प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाणार आहे. ऐन मान्सूनच्या तोंडावर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Farmer Loan Waiver: आचारसंहितेनंतर निकषांची घोषणा, ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ 🌾

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी!

२ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज पूर्ण माफ
२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असल्यास OTS (One Time Settlement) सुविधा
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹५०,००० पर्यंत प्रोत्साहन लाभ
लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार

पात्रता:

  • ०१ एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान घेतलेले पीक कर्ज
  • आधार प्रमाणीकरण व Agristack नोंदणी आवश्यक
  • राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती बँकांचे कर्जदार पात्र

OTS अंतर्गत स्वतःचा हिस्सा भरण्याची अंतिम मुदत:
३१ मार्च २०२७

सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, आयकर भरणारे व काही इतर प्रवर्ग या योजनेस अपात्र आहेत.