life certificate
ऑनलाईन हयातीचे सर्टिफिकेट आता मोबाईलवर | old pension
Beneficiary Satyapan Application
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या
लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
परभणी दि.15 (जिमाका) : परभणी तालुक्यातील सर्व शहर/ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य पुरस्कृत निवृत्ती वेतन योजना या योजनेतील केंद्र पुरस्कृत निवृत्ती वेतन योजनाच्या लाभार्थ्यांना 31 मे, 2026 पर्यंत आपले हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने सादर करावे असे आवाहन तहसिलदार डॉ. संदीप राजापुरे यांनी केले आहे.
शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ घेणा-या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकीट म्हणजे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट केलेले प्रमाणपत्र या प्रक्रियेसाठी आधार रिड फेस व बेनिफिशरी सत्यापन ॲप हे अॅप डाउनलोड करुन आधार प्रमाणीकरणाच्या आधारे फेस ऑथेंटिफिकेशन करायचे आहे. हे प्रमाणपत्र भेट एनएसएपी पोर्टलवर अपडेट होणार आहे. लाभार्थी स्वतः मोबाईलवरुन तसेच महा-ई-सेवा केंद्र, ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसिल कार्यालयाच्या मदतीने हि प्रक्रिया करु शकतात.
निराधारांना मिळणार घरबसल्या डिजिटल हयात प्रमाणपत्र
लाभार्थी सत्यापन (Life Certificate) ऑनलाइन कसे करावे?
गुगल प्ले स्टोअर वरुन आधार फेस आरडी ॲप आणि बेनिफिशरी सत्यापन ॲप हे दोन अॅप डाऊनलोड करुन ओपन करा. भाषा निवडल्यानंतर डिव्हाईस रजिस्ट्रेशन करा. आधार क्रमांक मोबाईल क्रमांक ई-मेल (ईच्छिक) माहिती भरावी. ओटीपी द्वारे रजिस्ट्रेशन पूर्ण करा त्यानंतर फेस ऑथेंटिफिकेशन करा. मोबाईलचा कॅमेरा वापरुन डोळ्यांची हालचाल करुन सेल्फी घ्या. त्यानंतर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळेल. तरी सर्व लाभार्थ्यांनी आपल्या हयातीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर बेनेफिशरी सत्यापन ॲपद्वारे ऑनलाईन तयार करुन शासनाच्या योजनांचा लाभ सुरु ठेवावा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.




